
‘लखपती दीदी’ अभियानाच्या वाढीव लक्षांकाबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ग्राम विकास मंत्री गोरे यांनी यंत्रणांना सूचित केले. बैठकीस ग्राम विकास सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर डुबे पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
ग्राम विकास मंत्री गोरे यांनी सांगितले की, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि ग्रामीण भागातील कुटुंबांचे उत्पन्न वाढविण्यासाठी ‘लखपती दीदी’ अभियान निश्चितच उपयोगी ठरणार आहे. त्यादृष्टीने याची अधिक व्यापक आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे. जिल्हानिहाय प्रगतीचा आढावा, महिला बचत गटांचे बळकटीकरण, नवीन महिलांचा समावेश, डिजिटल आजीविका नोंदणी, कौशल्य प्रशिक्षण तसेच उत्पन्नवाढीच्या विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मंत्री गोरे यांनी संबंधितांना सूचना दिल्या.