काही वर्षांपूर्वी ही सगळी दृश्यं आपल्या सरकारी कार्यालयांची ओळख होती. पण आज सगळं बदललं आहे – आणि त्या क्रांतीचं नाव आहे ‘ई-ऑफिस’
आता फाईलींचे ढीग नाहीत, अंतहीन फेऱ्या नाहीत, ‘प्रकरण मंत्रालयात आहे’ अशी उत्तरंही नाहीत! अर्ज दिला की तो थेट संगणकावर नोंदवला जातो, ऑनलाईन संबंधित अधिकाऱ्यांकडे पोहोचतो आणि त्याचा मागोवा आपण घरबसल्या घेऊ शकतो.
आश्चर्य वाटेल, पण हे आता वास्तव आहे:
– नंदुरबारसारख्या दुर्गम जिल्ह्यात तब्बल 34 कार्यालयं पूर्णपणे ई-ऑफिसवर
– अर्जांच्या स्थितीचा रिअल-टाईम मागोवा
– निर्णय प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणि जबाबदारी
– दुर्गम भागातही पोहोचलेले डिजिटल प्रशासन
ही फक्त प्रणाली नाही, हा एक प्रशासनातील सांस्कृतिक बदल आहे. एका शेतकऱ्याच्या आयुष्यात झालेला फरक असो वा नागरिकांच्या हक्कासाठीचा लढा – ई-ऑफिसने सगळं सोपं, पारदर्शक आणि वेगवान केलं आहे.
मा. जिल्हा माहिती अधिकारी श्री. रणजितसिंह राजपूत यांनी या परिवर्तनाची कहाणी खास लेखातून सांगितली आहे –
#EOFFICE#DigitalRevolution#SmartGovernance#GoodGovernance#TransformingIndia#Nandurbar#DigitalNandurbar#MahaSamvad#ईऑफिस#गतिमानप्रशासन#डिजिटलशासन#नवभारत
