Home शहादा म्हसावद येथे ‘महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; शेकडो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ

म्हसावद येथे ‘महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; शेकडो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ

'Maharajaswa Samadhan Shibir' concluded with enthusiasm at Mhasavad; Hundreds of citizens benefit from government schemes

ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रशासकीय अडचणी तातडीने सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’ अंतर्गत म्हसावद (ता. शहादा) येथे मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शेकडो नागरिकांना विविध दाखले, सातबारा दुरुस्ती तसेच शासकीय योजनांचे लाभ एकाच छताखाली प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. बालविकास विभागामार्फत नवजात शिशूंना बेबी केअर किट वितरित करण्यात आले तसेच ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ मोहिमेअंतर्गत वैष्णवी बागले हिला गौरविण्यात आले. मार्गदर्शन करताना त्यांनी प्रशासनाने जनतेच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या सोडविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.

शिबिरातील प्रमुख उपलब्धी :

२४१ शैक्षणिक दाखल्यांचे वितरण

‘जिवंत ७/१२’ मोहिमेअंतर्गत १७० वारस नोंदींची पूर्तता

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ६५ प्रकरणांना मंजुरी

३१ नवीन रेशन कार्ड, ३७ आयुष्मान भारत कार्ड वितरण

कृषी विभागामार्फत ३८ लाभार्थ्यांची ‘अग्रीस्टॅक’ नोंदणी

यावेळी ग्राम महसूल अधिकारी लक्ष्मण कोळी यांनी जमिनीच्या अकृषक (NA) रूपांतरणाच्या नवीन नियमांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विकास आराखडा मंजूर असल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची अट शिथिल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

‘जागतिक चिमणी दिना’चे औचित्य साधून वन विभागाने चिमणी संवर्धनाबाबत जनजागृती केली. उन्हाळ्यात चिमण्यांसाठी पाणी व अन्नाची व्यवस्था करण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमास तहसीलदार संभाजी पाटील, नायब तहसीलदार गिरीश परदेशी, निवासी नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, वनपरीक्षेत्र अधिकारी रामकृष्ण लामगे, सीडीपीओ सागर चौधरी तसेच विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किर्ती चौधरी यांनी केले तर प्रास्ताविक लक्ष्मण कोळी यांनी मांडले. शेवटी तहसीलदार संभाजी पाटील यांनी आभार मानले.

एकाच ठिकाणी विविध सेवा व योजनांचा लाभ मिळाल्याने म्हसावद परिसरातील नागरिकांनी प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त केले.

#maharajasvasamadhanshibir#PublicService#AapleSarkar#CitizenServices#nandurbar#collectorofficenandurbar

error: Content is protected !!
Exit mobile version