
काही काळापासून तांत्रिक अडचणींमुळे अनेक शिक्षकांचे वेतन रखडले आहे. अशा सर्व शिक्षकांचे वेतन तातडीने अदा करण्याची कार्यवाही पूर्ण करावी. याशिवाय, आदिवासी दुर्गम भागामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना ‘एकस्तर वेतनश्रेणी’ लागू करण्याबाबत सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा, अशा सूचनाही राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी शिक्षण आयुक्त कार्यालयाला दिल्या.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रश्नाबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.