
ओणी(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील मौजे पाचल गावातील दिवाळवाडीचे सुपुत्र डॉ. परशुराम सुतार
यांची सुकन्या कु. शुभ्रा परशुराम सुतार हिने यावर्षी इयत्ता 10 वी मध्ये तालुक्यात प्रथम येऊन आपल्या शाळेचे, आई वडिलांचे आणि गावाचं नावं रोशन केले. तिच्या या यशाची दखल घेत ओणी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ ओणी संचालित शांताराम भट इंग्लिश मीडियम स्कूल ओणी हायस्कुलने यावर्षी स्वातंत्र्य दिनाचा झेंडा कु. शुभ्राच्या हस्ते फडकवला ही पाचल गावच्या प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ओणी हायस्कूलच्या या अनोख्या आदर्श कृतीतून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असल्याचे शैक्षणिक क्षेत्रातून बोलले जात आहे कु. शुभ्रा हिच्यावर पाचल गावातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.