(नंदुरबार) जिल्हा प्रशासन व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिल्हास्तरीय मिनी सरस व विक्री प्रदर्शन – नंदिनी महोत्सव २०२६’ चा उद्घाटन सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता बचत गटांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. खा. ॲड. गोवाल पाडवी यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत ठाकुर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर शेजारील भव्य डोममध्ये आयोजित या महोत्सवात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील महिला बचत गटांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. मान्यवरांनी विविध स्टॉलना भेट देत महिलांच्या उत्पादनांचे कौतुक केले.
• नंदुरबारची प्रसिद्ध लाल मिरची, मसाले व वनौषधी
• हस्तकला वस्तू व आकर्षक गृहउपयोगी साहित्य
• अस्सल खान्देशी खाद्यपदार्थ — खापरावरची पुरणपोळी, धपाटे, भरीत-भाकरी
• दररोज सायंकाळी आदिवासी लोकनृत्य, संगीत व सांस्कृतिक कार्यक्रम
“बचत गटांची शक्ती, समृद्धीची युक्ती” या ब्रीदाखाली सुरू झालेला हा महोत्सव नंदुरबारकरांसाठी खरेदी, संस्कृती आणि मनोरंजनाची पर्वणी ठरणार असून ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा देणार आहे.
#NandiniMahotsav#Nandurbar#UMED#SelfHelpGroups#WomenEmpowerment#VocalForLocal#TribalCulture#Khandesh#RuralEntrepreneurship#Maharashtra
