Home नंदुरबार जिल्हा नवनिर्मित जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबार विकासात अग्रेसर : डॉ.विजयकुमार गावित

नवनिर्मित जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबार विकासात अग्रेसर : डॉ.विजयकुमार गावित

(नंदुरबार) अनेक अडचणी व परिस्थितीवर मात करुन नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली असून गत 25 वर्षांत नंदुरबार जिल्हा इतर नवनिर्मित जिल्ह्यांच्या तुलनेत निश्चितच अग्रेसर आहे. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी पुढील 25 वर्षांचा विकास आराखडा तयार करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

पुढील 25 वर्षांचा विकास आराखडा तयार करणार

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित, जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, तहसीलदार पुलकित सिंह,यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री डॉ.गावित म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीसाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांचा सहभाग महत्वाचा असून जिल्हा निर्मितीसाठी यासर्वांचे योगदान महत्वाचे आहे. त्यांनी जी शक्ती दिली त्यामुळेच हे निर्माण करु शकलो. नंदुरबार जिल्हा हा आकांक्षित जिल्हा असून याचा विकास करणे आवश्यक आहे. नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत निश्चितच अग्रेसर असून पुढील 25 वर्षांचा विकास आराखडा तयार करुन येथील कृषी, सिंचन व रोजगारांचा प्रश्न कायम स्वरुपी मिटविण्यासाठी प्रत्येक विभागाचा एक आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी सर्व विभागांनी आपले प्रस्ताव सादर करावेत. या विकास आराखड्यातून येत्या 25 वर्षांत नंदुरबार जिल्हा परीपूर्ण करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील एकही व्यक्तीं रोजगारासाठी जिल्ह्यांच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे कृषी क्षेत्रात मोठा वाव आहे यातून मोठे उद्योग आपण उभारु शकतो. यासाठी येत्या काही दिवसात दर 15 दिवसांची प्रत्येक विभागाचा एक परिसंवाद घडवून आणणार असून या परिसंवादात राज्यातील तसेच जिल्ह्यातील तज्ञ व्यक्तिंना बोलविण्यात येईल. व त्यांच्याकडून जिल्ह्यांचा विकासाचा परिपूर्ण आराखडा तयार करण्याची संकल्पना असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात कृषी, सिंचनांची परीपूर्ण व्यवस्था केली तरच येथील नागरिकांचे रोजगारासाठी स्थलांतर होणार नाही. यामुळे कृषी उत्पादनात वाढ करण्याबरोबरच कृषी विषयी फॉर्मा कंपनीतून अनेक रोजगार उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. येत्या दोन वर्षांत सर्व पाडे, रस्त्यांनी बारमाही जोडणार असून जिल्ह्यातील कोणतेही पाडा, वस्ती रस्त्यापासून वंचित राहणार नाही. येत्या दोन वर्षांत रस्ते, विजेचा प्रश्न सोडविण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी पारंपारिक कला उत्सव, समारंभ तसेच आदिवासी संस्कृतीचे जतन व संस्कृतीला वाव देण्यासाठी आदिवासी सांस्कृतिक भवन,आदिवासी कला केंद्र बांधण्याबाबत येणार आहे. आरोग्यांच्या सुविधाबाबत आपण निश्चित चांगले असून त्यात आणखी भर टाकण्याचा प्रयत्न आपण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. नंदुरबार येथे मेडिकल कॉलेज हे 12 वर्षांपूर्वी सुरु झाला पाहिजे होता. पंरतू हे मेडीकल कॉलेज निर्माण करण्यासाठी बऱ्याच अडचणी आल्यात त्या सोडविण्यासाठी खासदार डॉ.हिना गाविताचे ही मोलाचे सहकार्य लाभले, असेही मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

गत 25 वर्षांत विकास कामांना गती

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित म्हणाल्या की, जिल्हा निर्मिर्तीस पालकमंत्री डॉ.गावित यांचे योगदान मोठया प्रमाणात आहे. जिल्हा निर्मितीसाठी डॉ.गावितांनी खूप परिश्रम केले.जिल्हा निर्मितीनंतर नंदुरबार जिल्ह्यात आमुलाग्र असे बदल झाले आहेत. पूर्वी नंदुरबार जिल्हा अस्तित्वात नसतांना बहुतेक शासकीय कामासाठी धुळे जिल्ह्यात जावे लागत होते. त्यामुळे येथील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. नंदुरबारच्या विकास कामासाठी पुरेसा निधी मिळत नव्हता. त्यामुळे नंदुरबारचा विकास खुंटला होता. परंतू जिल्हा झाल्यांवर पुरेसा निधी मिळाल्याने विकास कामे होऊ शकली. जिल्ह्यात सर्व विभागाची स्वतंत्र अशी इमारती उभ्या आहेत. सिंचनासाठी जिल्हा झाल्यावर चांगली सुरुवात झाली असून दुर्गम भागात अंगणवाडी तसेच डिजिटल शाळा ऊभारुन दुर्गम भागात शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येत्या 25 वर्षांत जिल्ह्यातील विकास कामे अधिक वेगाने गतीमान करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

बहुसांस्कृतिक नंदुरबार जिल्हा

खासदार डॉ.हिना गावित म्हणाल्या की, आजचा दिवस जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तींसाठी खूप विशेष आहे. आज पासून बरोबर 25 वर्षांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यांची ओळख महाराष्ट्रांच्या नकाशावर जिल्हा म्हणून झाली असून आज यशस्वीपणे हे 25 वर्ष आपण पूर्ण करीत आहोत. जेव्हा जिल्हा निर्मिती झाली त्या ऐतिहासिक सोहळ्याला मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली होती. आणि आज 25 वर्षांच्यापुर्तीच्या निमित्तांने जिल्ह्याची खासदार म्हणून केंद्रातील संसदेत प्रतिनिधीत्व देण्याची संधी मला नंदुरबार जिल्ह्यांची लोकांनी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. सौंदयाच्या दृष्टीने आपला जिल्हा वेगवेगळया वैशिष्ट्यांनी नटलेला आहे. सातपुडा,सह्याद्रीची सुरुवात आपल्या जिल्ह्यापासून झाली असून जिल्ह्यात उनपदेव सारखे गरम पाण्याची झरे आहेत, नंदुरबार जिल्ह्यांची आदिवासीची पारंपारिक अशी संस्कृती असून येथील होळी सणासाठी भारतातील नव्हे तर आंतरराष्ट्रीय पर्यटकही येतात. सारंगखेडा येथील घोड्यांची प्रसिद्ध यात्रा, दक्षिण काशी म्हणून प्रकाशाची ओळख, तोरणमाळ सारखे महाराष्ट्रांतील दुसरे थंड हवेचे ठिकाण हीच आपल्या नंदुरबार जिल्ह्यांची शान असल्याचे त्यांनी सांगितले. तोरणमाळ येथील पर्यटक क्षेत्र संपूर्ण भारतात कसे प्रसिद्ध होईल. यादृष्टीने येत्या काळात काम करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. सातपायरी घाटात रेल्वे उभारण्याची संकल्पना त्यांनी यावेळी मांडल्या. तसेच नंदुरबार जिल्हा निर्मितीसाठी पालकमंत्री डॉ.गावित साहेबांनी बरीच मेहनत घेतली असून जिल्हा निर्मितीसाठी बऱ्याच अडचणी आल्या होत्या यासर्व अडचणीवर मात करुन 25 वर्षांपूवी जिल्हा निर्मिण झाला. आज नंदुरबार जिल्ह्यासोबत नवीन जिल्हे झालेत त्यांच्या कित्येक पटीत आपला जिल्हा पुढे असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमांला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version