(नंदुरबार)
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुलाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस मा. आमदार डॉ. विजयकुमार गावित, मा. पोलिस अधीक्षक, विविध उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी, कार्यकारी अभियंते, वित्त अधिकारी, जिल्हा माहिती व तंत्रज्ञान अधिकारी तसेच विविध खेळ संघटनांचे प्रतिनिधी व राष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते.
बैठकीत क्रीडा संकुलातील सुरू असलेली कामे व भविष्यातील विकास आराखड्यावर चर्चा होऊन खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले:
1. दुसऱ्या टप्प्यातील सुविधा उभारणी
सुधारित आराखडे व अंदाजपत्रक तयार करून पुढील सुविधा प्रस्तावित:
• 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक
• नॅचरल ग्रासचे फुटबॉल मैदान
• 50 x 21 मीटर जलतरण तलाव
• अद्यावत जिम (स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग सेंटर)
• बास्केटबॉल व लॉन टेनिस मैदान दुरुस्ती व आधुनिकीकरण
• आर्चरी रेंज, क्लाईंबिंग वॉल, बॉक्स क्रिकेट सुविधा
• विद्युतिकरण व पिण्याच्या पाण्याची सोय
2. ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांवर लक्ष केंद्रित
• 10 ते 12 प्रतिनिधींची समिती स्थापन होणार.
• जिल्ह्यातील 4 ते 5 महत्त्वाचे ऑलिम्पिक खेळ निवडले जातील.
• या खेळांसाठी ‘अम्ब्रेला प्रोजेक्ट’ तयार केला जाणार असून त्यात:
• स्पर्धा आयोजन
• खेळाडूंच्या प्रवास खर्चाची तरतूद
• मार्गदर्शन सत्रे
• खेळाडूंचा विमा
• स्पोर्टस् सायन्स सपोर्ट
• पोषण (Nutrition)
• स्पोर्ट्स किट व साहित्याचा समावेश असेल.
हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर होणार आहे.
3. सादरीकरणे व माहिती
• मा. रणजित चामले (विशेष कार्य अधिकारी, क्रीडा मंत्री) यांनी ‘मिनी लक्ष्यवेध’ या योजनेबाबत सादरीकरण केले.
• मा. अविनाश टिळे (कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग) यांनी इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात माहिती दिली.

#Nandurbar#SportsComplex#DrMitaliSethi#SportsDevelopment#YouthEmpowerment#OlympicSports#Maharashtra