Home नंदुरबार अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत नंदुरबार रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट रुपये 15 कोटींची...

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत नंदुरबार रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट रुपये 15 कोटींची करण्यात आली तरतूद!

Nandurbar Railway Station will be transformed under the Amrit Bharat Station Scheme, a provision of Rs. 15 crore has been made!

(नंदुरबार) भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात रुपये 15 कोटींच्या निधीसह नंदुरबार रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत काल झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री श्री.वैष्णव यांचे आभार मानले.

या योजनेमुळे नंदुरबार स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे. त्यासाठी 15 कोटींचा निधीची तरतूद करण्यात आली आहे.

0000000000

error: Content is protected !!
Exit mobile version