Home शैक्षणिक जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर मनाई आदेश लागू

जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर मनाई आदेश लागू

Prohibitory orders imposed on examination centers in the district

हत्त्वाची माहिती – दहावी आणि बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर गैरप्रकार रोखण्यासाठी आणि परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी 11 फेब्रुवारी 2025 ते 18 मार्च 2025 या कालावधीसाठी मनाई आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार:

परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात बाहेरील व्यक्तींना प्रवेशास बंदी

परीक्षा केंद्राच्या 500 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, सायबर कॅफे, एस.टी.डी./आय.एस.डी. टेलिफोन, फॅक्स केंद्र आणि ध्वनीक्षेपक बंद राहणार

फक्त अधिकृत परीक्षा कर्मचारी, पोलीस व परीक्षार्थींनाच प्रवेश

परीक्षेच्या दिवशी सकाळी 8:00 ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असतील.

विद्यार्थ्यांनी शांततेत आणि निर्भयपणे परीक्षा द्यावी, तसेच नागरिकांनी सहकार्य करावे!

ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला आणि पालकांना याची माहिती मिळेल.

#SSC2025#HSC2025#मनाईआदेश#Nandurbar#ExamRules

error: Content is protected !!
Exit mobile version