(नंदुरबार) नंदुरबार जवळील आक्राळे येथे मदारीकडून नाग ताब्यात घेऊन नागाला जीवदान देण्यात आले आहे. नंदुरबार येथील सर्पमित्र वैभव राजपुत, रोहित राजपुत, देवेंद्र वसयकर,ओम कोडक, संजय वानखेडे यांनी हे काम केले आहे. (Latest Nandurbar News)
नंदुरबार जवळील आक्राळे या गावात दि. 03/09/2023 रोजी मदारी सापाचा खेळ करत असल्याची बातमी नंदुरबार चे सर्पमित्र वैभव राजपुत, रोहित राजपुत, देवेंद्र वसयकर,ओम कोडक, संजय वानखेडे यांना मिळाली. यांनी त्यांच्या सहकारी मित्र यांना सोबत घेऊन आक्राळे गाव गाठले. तेथे मदारी सापाचा खेळ करत होता. सर्पमित्रांनी मदारी कडुन सदर सापाला ताब्यात घेतले. सदर मदारी सर्पमित्र बघुन घाबरुन पळुन गेले. सापाला ताब्यात घेऊन वनविभाग नंदुरबार येथे आनण्यात आले. तेथे RFO वर्षा पाटील यांच्या मार्गदर्शना खाली बिलाल शहा यांच्या सोबत वैद्यकीय तपासनी साठी पाठवण्यात आले. परिसरातील वन विभागाच्या नैसर्गिक अधिवासात नागाला सोडून देण्यात आले. (Latest Nandurbar News)