
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. विद्यमान आयटीआय मध्येच इमारतींमध्येच विद्यार्थ्यांना हे शिक्षण दिले जाणार असून, अद्ययावत व उद्योगाभिमुख प्रशिक्षणामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.
निवडक आयटीआय संस्थांना प्रत्यक्ष भेटी देऊन आवश्यक पायाभूत सुविधा तातडीने विकसित करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच सागरी व किनारी भागांमधील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची रचना करण्यावर विशेष भर देण्यात आला. विशेषतः शिप बिल्डिंग, पोर्ट ऑपरेशन्स, लॉजिस्टिक्स, मरीन मेकॅनिक्स, कोस्टल मॅनेजमेंट आणि सागरी सुरक्षा यासारखे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. वाढवण बंदर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींचा विचार करून उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित करण्याचे निर्देशही मंत्री राणे यांनी दिले. स्थानिक युवकांना प्राधान्याने प्रशिक्षण देऊन त्यांना बंदर क्षेत्रातील रोजगारासाठी सक्षम करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.