Home शैक्षणिक होलार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात...

होलार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात येईल

2
A committee will be constituted to study the social, educational, and economic status of the Holar community.

समितीच्या अहवालाच्या आधारे समाजाच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येतील, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली होलार समाजाच्या विविध प्रश्नाबाबत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, दूरदृश्य प्रणालीद्वारे समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ – मुंडे, होलार समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.