
समितीच्या अहवालाच्या आधारे समाजाच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येतील, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.
मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली होलार समाजाच्या विविध प्रश्नाबाबत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, दूरदृश्य प्रणालीद्वारे समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ – मुंडे, होलार समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.















