Home नंदुरबार जिल्हा रंगावली मध्यम प्रकल्प सतर्कतेचा इशारा

रंगावली मध्यम प्रकल्प सतर्कतेचा इशारा

0
Alert issued for the Rangavali Medium Project.

नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक नंदुरबार या उपविभागांतर्गत असलेल्या रंगावली मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. या प्रकल्पाच्या धरण क्षेत्रात व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाउस झाल्यामुळे सदर प्रकाल्प्च्या पाणी पातळीत वाढ झाली असून सध्यास्थितीत पाणी पातळी 226.25 मी. ची नोंद झाली आहे. त्याअन्वये सदर प्रकल्पात 100% पाणी साठा झाला असून सदर प्रकल्पाच्या सांडव्यावरून 5494.56 क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील रंगावली मध्यम प्रकल्प या योजनेच्या खालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे उन्बर्डी, खर्बडर्डी, प्रतापपूर, चौकी, बोकळझर, रायपुर, धनराट, नांदवन, विजापूर, मोरथवा, वाग्ळापाडा,न नवापूर येथील नदी पात्रामध्ये गुरढोरे सोडण्यात येऊ नये व कोणत्याही मनुष्याने नदीपात्रात जावू नये तसेच नागरिकांनी
आवश्यक ती खबरदारी घयावी असे आवाहन करण्यात आले आहे.