नवापूर येथून दुचाकी लंपास

(नवापूर) दुकानाजवळ दुचाकी चोरीला गेल्याची घटना नवापूर येथे घडली. याप्रकरणी अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवापूर येथून दुचाकी लंपास

उच्छल तालुक्यातील वडपाडाभित येथील गणेशभाई समुवेलभाई गामित यांनी नवापूर येथे एका कपड्याच्या दुकानाच्या बोळीजवळ दुचाकी (क्र.जीजे २६ एच ४१९८) उभी केली होती. चोरट्याने सदरची दुचाकी चोरून नेली आहे. याबाबत गणेशभाई गामित यांनी नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखीविरुद्ध भा.न्या.सं.चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेकॉ.अनिल गावित करीत आहेत.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: