नवापूर तालुक्यात मानवाधिकार व भ्रष्टाचारविरोधी संघटनेची नवीन कार्यकारणी जाहीर; अमृत नाईक अध्यक्षपदी तर लक्ष्मण गावित उपाध्यक्ष
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुका मानवाधिकारी चळवळीला नवी ताकद श्री.अमृत नाईक,तालुका अध्यक्ष श्री.लक्ष्मण गावित उपाध्यक्ष नवापूर तालुका, श्री.गिरीश वसावे कार्याध्यक्ष तसेच धर्मा वसावे सचिव पदी महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली.
मानवा अधिकारांचे संरक्षण सामाजिक न्यायाची जपणूक आणि भ्रष्टाचार विरोधात जनजागृती करणाच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या नॅशनल ह्यूमन राईट अँड अँटी करप्शन सोशल जस्टीस फाउंडेशनच्या नवापूर तालुका कार्यकारणीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली या निवडीत श्री.अमृत नाईक तालुकाध्यक्षपदी श्री.लक्ष्मण गावित उपाध्यक्षपदी श्री. गिरीश वसावे कार्याध्यक्ष श्री.धर्मा वसावे सचिव पदी नियुक्ती करण्यात आली या निवडीमुळे नवापूर तालुक्यात संघटनेच्या सामाजिक कार्याला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नॅशनल ह्यूमन राईट अँड अँटीकरप्शन सोशल जस्टीस फाउंडेशन गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बैठकीत नवापूर तालुका कार्यकारणीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आल्या या निवडीच्या माध्यमातून तालुक्यात संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्याची जबाबदारी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर संपवण्यात आली आहे.मानवाधिकारांचे संरक्षण आणि सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे ही संघटनेच्या कार्यातील महत्त्वाची उद्दिष्टे आहेत समाजातील विविध घटनांना भेडसावणाऱ्या समस्या अन्याविरोधातील लढा आणि सामाजिक न्यायाशी संबंधित प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत तसेच भ्रष्टाचारा विरोधात जनजागृती करून नागरिकांना त्यांच्या अधिकारांबाबत जागरूक करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे.
नवापूर तालुक्यात संघटनेची व्याप्ती वाढवून मानवाधिकार सामाजिक न्याय आणि भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची संधी या निवडीमुळे उपलब्ध झाले आहे नागरिकांच्या समस्या संबंधित यंत्रणा पर्यंत पोहोचविणे आणि समाज हिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविणे अशी अपेक्षा नवनियुक्त पदी पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे दरम्यान श्री.अमृत नाईक, श्री.लक्ष्मण गावित, श्री. गिरीश वसावे श्री.धर्मा वसावे यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहेत.
Follow Us:

