‘प्रकाशवाटा’ उपक्रमामुळेआदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची नवी दिशा

नंदुरबार : महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, खडकी, ता. नवापूर येथे विद्यार्थ्यांसाठी ‘प्रकाशवाटा’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
‘प्रकाशवाटा’ उपक्रमामुळेआदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची नवी दिशा
prakashvata-initiative-higher-education-tribal-students
        या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या हस्ते झाले. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबारचे प्रकल्प अधिकारी श्री. चंद्रकांत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘प्रकाशवाटा’ उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या विविध संधी, शैक्षणिक मार्गदर्शन आणि पुढील वाटचालीसाठी आवश्यक दिशा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनील पाटील यांनी पारंपरिक पद्धतीने मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या आकांक्षांना योग्य दिशा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘प्रकाशवाटा’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: