नवापूर तालुक्यात महसूल सेवक (कोतवाल) पद भरती आरक्षण निश्चितीसाठी नवापूर येथे सभेचे आयोजन

(नंदुरबार) तहसिल कार्यालय, नवापूर येथील महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील बिंदू नामावली सहाय्यक आयुक्त (मावक), नाशिक यांच्याकडून मंजूर करण्यात आली आहे.
नवापूर तालुक्यात महसूल सेवक (कोतवाल) पद भरती आरक्षण निश्चितीसाठी नवापूर येथे सभेचे आयोजन
navapur-taluka-revenue-servant-kotwal-recruitment-reservation-meeting-scheduled

या बैठकीत समांतर आरक्षण (महिला) सोडत चिठ्ठीच्या माध्यमातून निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरिकांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार, नवापूर दत्तात्रय जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.त्यानुसार नवापूर तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील 5 रिक्त पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी तहसील कार्यालय,सभागृह, नवापूर येथे गुरुवार, दि. 1 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3-00 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: