8 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक

(नंदुरबार) शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक
8 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक
8-october-district-level-anti-corruption-committee-quarterly-meeting

आयोजित करण्यात आली असून ही बैठक गुरुवार, दिनांक 8 ऑक्टोबर,2026 रोजी दुपारी 1.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रंगावली सभागृह,नंदुरबार येथे पार पडणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रकान्वये जिल्हा व तहसील स्तरावर भ्रष्टाचार निर्मूलन समित्या व दक्षता पथके स्थापन करण्याबाबत सर्वसमावेशक आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यामध्ये या समितीची त्रैमासिक बैठक होणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या बैठकीची नोंद घ्यावी, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: