सेवा संकल्प अभियानांतर्गत कोठली येथे ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला बचत गट’ स्थापनेसाठी विशेष मोहीम,आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी होण्यासाठीमार्गदर्शन

नंदुरबार:-सेवा संकल्प अभियानांतर्गत कोठली, ता. नंदुरबार येथे आदिवासी महिलांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार यांच्या माध्यमातून ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला बचत गट’ स्थापन करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.
सेवा संकल्प अभियानांतर्गत कोठली येथे ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला बचत गट’ स्थापनेसाठी विशेष मोहीम,आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी होण्यासाठीमार्गदर्शन
kothali-tribal-women-self-help-group

या मोहिमेदरम्यान महिलांना बचत गटाच्या माध्यमातून नियमित बचत, स्वयंरोजगार, विविध शासकीय योजना तसेच उपलब्ध आर्थिक व संस्थात्मक सहाय्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी एकत्रित येऊन बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाच्या दिशेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. राणी दुर्गावती आदिवासी महिला बचत गटाच्या स्थापनेसाठी आदिवासी विकास निरीक्षक हरिष कलाल व आबा बडगुजर यांनी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गट स्थापन करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, कार्यपद्धती आणि बचत गटाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या संधींबाबत महिलांना माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे आदिवासी महिलांना संघटित होऊन नियमित बचतीची सवय लावणे, स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घेणे आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील महिला सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,नंदुरबार सहाय्यक प्रकल्प अधिकारी किरण मोरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: