नंदुरबार जिल्ह्यात महारोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; १७५ युवकांना नियुक्तीपत्रे

(नंदुरबार) कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्या’चा नाशिक विभागात शुभारंभ मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला.
नंदुरबार जिल्ह्यात महारोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; १७५ युवकांना नियुक्तीपत्रे
nandurbar-maharojgar-melava-response-175-youths-get-appointment-letters
        नंदुरबार जिल्ह्यात कौशल्य विकास विभाग व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ९ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले. नंदुरबार, अक्कलकुवा, तळोदा, शहादा, नवापूर व अक्राणी तालुक्यांत झालेल्या या मेळाव्यांना २,४७५ उमेदवार आणि ७१ उद्योजक सहभागी झाले.
          विविध आस्थापनांमधील १,४४६ रिक्त पदांसाठीउमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी १,०४७ उमेदवारांची प्राथमिक निवड, तर १७५ उमेदवारांची अंतिम निवड झाली. निवड झालेल्या **१७५ उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
 बदलत्या तंत्रज्ञानानुसार युवकांनी कौशल्यवृद्धी करून रोजगाराच्या नव्या संधींचा लाभ घ्यावा, यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: