नंदुरबार जिल्ह्यात 3, 4 व 10, 11 ऑक्टोबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिर
(नंदुरबार) 18 ते 19 वयोगटातील युवक-युवतींसह पात्र नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे — जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी
आगामी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 3 व 4 ऑक्टोबर तसेच 10 व 11 ऑक्टोबर 2026 रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार व नवापूरया चारही विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शिबिरे घेण्यात येणार आहेत.
नवीन मतदार नोंदणीसाठीनमुना अर्ज क्र. 6, तर मतदार यादीतील नाव, छायाचित्र, पत्ता किंवा इतर तपशीलात दुरुस्तीसाठी अर्ज क्र. 8 उपलब्ध राहणार आहे. मतदान केंद्रांवर बीएलओ नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करणार आहेत.
नागरिकांना Voter Helpline App तसेच voters.eci.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
विशेषतः 18 ते 19 वयोगटातील युवक-युवतींनीतसेच अद्याप मतदार नोंदणी न केलेल्या पात्र नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.मित्ताली सेठीयांनी केले आहे.
Follow Us:

