Home नवापुर नवापूर येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न

नवापूर येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न

1
Taluka-level review meeting held at Navapur in the presence of the Guardian Minister.

(नवापूर) मा. ना. श्री. हसन मुश्रीफ, मंत्री, वैद्यकीय शिक्षण, महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री नंदुरबार जिल्हा यांच्या उपस्थितीत नवापूर येथे तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न झाली.

🔹 बैठकीच्या प्रारंभी माजी मंत्री तथा माजी विधानपरिषद व विधानसभा सदस्य स्व. स्वरूपसिंग नाईक यांच्या निधनाबद्दल विधानसभा व विधान परिषदेकडून प्राप्त स्मृतिपत्र व शोक प्रस्तावाची प्रत मा. पालकमंत्र्यांच्या हस्ते आमदार शिरीषकुमार नाईक यांना देण्यात आली.

🔹 बैठकीत सामाजिक सुरक्षा योजना, मातोश्री पाणंद रस्ते व मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना, सार्वजनिक वितरण व्यवस्था, घरकुल योजना, कृषी व खत उपलब्धता, सहकार व कर्जमाफी तसेच आरोग्य विभागाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

🔹 पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे अनुदान वेळेत मिळावे, नागरिकांना धान्याचा सुरळीत पुरवठा व्हावा आणि प्रलंबित विकासकामांना गती मिळावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

🔹 शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खताचा पुरेसा पुरवठा उपलब्ध करून देण्यासोबतच कर्जमाफीच्या पात्र लाभार्थ्यांचे प्रलंबित कामकाज प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

🔹 साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक पूर्वतयारी ठेवावी व पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा, असेही निर्देश देण्यात आले.

🔹 बैठकीस आमदार शिरीषकुमार नाईक, जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित, सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

🔹 नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळावा, विकासकामांना गती मिळावी आणि प्रशासन अधिक नागरिकाभिमुख व परिणामकारक व्हावे, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.