राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात संपन्न

नंदुरबार: आदिवासी विकास विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार यांच्या वतीने सेवा संकल्प अभियानाचे औचित्य साधून राणी दुर्गावती जयंतीनिमित्त ‘राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण’ विशेष महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला.
राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात संपन्न
rani-durgavati-women-empowerment-fair-concludes
        छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे झालेल्या कार्यक्रमास मा.आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, पर्यवेक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी पंकज पटले व प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार उपस्थित होते.
 यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, शासकीय सेवेत रुजू झालेल्या, उच्च पदवी संपादन केलेल्या तसेच क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. तसेच पात्र महिला बचत गटांना DBT द्वारे आर्थिक मदत, विविध योजनांचे प्रमाणपत्र व घरकुल योजनेतील निवड प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
          महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, बचत गट सक्षमीकरण कार्यशाळा तसेच स्वयंरोजगार, उद्योग निर्मिती, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, आर्थिक सहाय्य व कल्याणकारी योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
 नंदुरबार, शहादा व नवापूर तालुक्यातील 600 हून अधिक महिला व बचत गट सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
 महिला सक्षमीकरणातून स्वावलंबी कुटुंब आणि सक्षम समाज घडविण्याचा संकल्प!
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: