दुचाकींच्या अपघातात एक जखमी
तळोदा - दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना प्रतापपूर येथे घडली. याप्रकरणी एका मोटरसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथील महेंद्र लक्ष्मण शिंदे हे दुचाकीने (क्र.एमएच ३९ ए ८२७८) प्रतापपूर ते राणीपूर रस्त्याने शेतात जात होते. यावेळी भरधाव वेगात मागून आलेल्या मोटरसायकलने (क्र.एमएच ३९ एपी ५७५६) जोरात दुचाकीला धडक दिली. या अपघातात महेंद्र लक्ष्मण शिंदे हे जखमी झाले. तसेच मोटरसायकलस्वार तिघांवरील शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली.
