शासकीय आश्रमशाळा डाब व सेमी सेंट्रल किचन भगदरी येथे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची भेट; विद्यार्थ्यांच्या सुविधा व भोजन व्यवस्थेची पाहणी

तळोदा प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक वातावरण, सुरक्षित निवासव्यवस्था आणि गुणवत्तापूर्ण भोजन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा, डाब तसेच सेमी सेंट्रल किचन, भगदरी येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी व परीक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी पंकज पटले उपस्थित होते.
शासकीय आश्रमशाळा डाब व सेमी सेंट्रल किचन भगदरी येथे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची भेट; विद्यार्थ्यांच्या सुविधा व भोजन व्यवस्थेची पाहणी
collector-mitali-sethi-visits-dab-ashram-school-bhagdari-kitchen
        जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी शाळा इमारत, मुलींचे वसतिगृह तसेच विविध पायाभूत सुविधांची पाहणी केली. विद्यार्थिनींशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा व दैनंदिन समस्यांची माहिती जाणून घेतली.
 विद्यार्थ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेत शैक्षणिक व निवासी व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला.
        सेमी सेंट्रल किचन, भगदरी येथे भोजन तयार करण्याची प्रक्रिया, स्वच्छता, भोजनाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांना वेळेत गरम व पौष्टिक भोजन पोहोचविण्याच्या व्यवस्थेची तपासणी करण्यात आली.
 विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि शैक्षणिक प्रगती यांना केंद्रस्थानी ठेवून आश्रमशाळांचे आधुनिकीकरण, सुविधा बळकटीकरण आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: