महिला सक्षमीकरण मेळावा व रानभाज्या महोत्सव उत्साहात संपन्न

तळोदा : सेवा संकल्प अभियानांतर्गत राणी दुर्गावती जयंतीनिमित्त तळोदा येथील आदिवासी सांस्कृतिक भवनात महिला सक्षमीकरण मेळावा व रानभाज्या महोत्सव उत्साहात संपन्न झाला. तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील २ हजारांहून अधिक आदिवासी महिला व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
महिला सक्षमीकरण मेळावा व रानभाज्या महोत्सव उत्साहात संपन्न
Women's Empowerment Gathering and Wild Vegetable Festival Concluded Successfully
        कार्यक्रमास मा.आमदार राजेशदादा पाडवी, मा.आमदार आमश्या पाडवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
‘उमेद’ अभियानांतर्गत नव्याने स्थापन झालेल्या बचत गटांना प्रत्येकी ₹१० हजार निधीचे धनादेश तसेच विविध शासकीय योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना लाभांचे वितरण करण्यात आले.
        रानभाज्या महोत्सवात महिला बचत गट व विद्यार्थिनींनी पारंपरिक व पौष्टिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारून आदिवासी संस्कृती, पारंपरिक आहार व महिला उद्योजकतेचे दर्शन घडविले.
यावेळी शासकीय दाखले वाटप, मोफत आरोग्य तपासणी व उपचार आणि महिला शेतकरी नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले. शासनाच्या योजना व सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाला बळ देणारा ठरला.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: