जिल्हास्तरीय लोकशाही दिनात नागरिकांच्या तक्रारींना प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद

नंदुरबार: नागरिकांच्या तक्रारी व अडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर कार्यवाही करण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय लोकशाही दिनास नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात नागरिकांच्या तक्रारींना प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद
District-Level Lokshahi Din: Positive Administrative Response
        ५ ऑक्टोबर रोजी झालेल्या लोकशाही दिनात महसूल, जिल्हा परिषद, पोलीस आणि नगरपालिका या विभागांशी संबंधित एकूण ४ अर्ज प्राप्त झाले. तसेच यापूर्वी प्राप्त झालेल्या २ अर्जांचा आढावा घेण्यात आला.
नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांची प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात असून, संबंधित विभागांच्या माध्यमातून त्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे सोडविणे आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने लोकशाही दिन हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे.
 नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर कार्यवाही करण्यास जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: