२१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ चा दिमाखात शुभारंभ
२१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ या सोहळ्याचे उद्घाटन ६ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्य राखीव पोलीस दल, बल गट क्र. २, पुणे येथे प्रमुख पाहुणे डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या हस्ते संपन्न झाले. श्री. सुनील रामानंद, अपर पोलीस महासंचालक, गु.अ.वि., पुणे यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या मेळाव्यात एकूण २६ संघांनी सहभाग नोंदविला आहे.अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यांमध्ये गेल्या काही वर्षात महाराष्ट्र पोलीस दलाने अनुक्रमे १२, ११, ७, ४ आणि ११ पदके मिळवत विविध विजेतेपद व उपविजेतेपदाची पारितोषिके पटकावली आहेत.
५ ते १० ऑक्टोबर २०२६ दरम्यान आयोजित या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील ज्ञान, कौशल्य, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडविणाऱ्या स्पर्धा पार पडणार आहेत.
Follow Us:

