शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन क्रीडा विभागाने अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
shiv-chhatrapati-sports-awards-apply-online-by-nov-30

         त्यामुळे इच्छुक खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमांतील खेळाडू व व्यक्तींना २६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत अर्ज सादर करता येणार असल्याची माहिती मुंबई जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

        महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या वर्षांसाठी प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यातील उत्कृष्ट खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारांनी गौरविण्यात येते. यामध्ये क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, तसेच खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि साहसी उपक्रमांतील उल्लेखनीय कामगिरीसाठीच्या पुरस्कारांचा समावेश आहे.

इच्छुकांनी https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्याकडून करण्यात आले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: