नंदुरबारमध्ये पहाटेच बसले जोरदार हादरे! अवैध ब्लास्टिंग करणाऱ्या कंपनीला तहसीलदारांनी ठोठावला १९ लाखांचा दंड
नंदुरबार येथील धुळे चौफुली परिसरातील टेकडीवर परवानगीपेक्षा अधिक आणि अवैध ब्लास्टिंग करून गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदार कंपनीला तहसील प्रशासनाने १९ लाख १ हजार ९२० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
- अवैध ब्लास्टिंग आणि भीतीचे वातावरण: पहाटेच्या सुमारास धुळे चौफुली परिसरात जोरदार हादरे बसल्याने नागरिकांनी चौकशी केली असता, नागरी वस्तीजवळच स्फोटके लावून डोंगरात अवैध ब्लास्टिंग सुरू असल्याचे समोर आले.
- परवानगीचे उल्लंघन: ‘श्री गणपती भारत प्रा. लि.’ या कंपनीला केवळ २ हजार १०० ब्रास मुरूम उत्खननाची अधिकृत परवानगी देण्यात आली होती. मात्र, कंपनीने कोणतीही परवानगी नसताना स्फोटकांचा वापर करून डोंगरातून अवैधरित्या तब्बल ३०० ब्रास दगडाचे उत्खनन केले.
- प्रशासनाची कठोर कारवाई: नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या प्रकाराची गंभीर दखल घेत नंदुरबारचे तहसीलदार संतोष ढेरे आणि मंडळ अधिकारी बळीराम चाटे यांच्या पथकाने घटनास्थळी कारवाई करत १९,०१,९२० रुपयांचा दंड आकारला.
- उत्खनन व वाहतूक तात्काळ बंद: प्रशासनाने संबंधित ठिकाणचे सर्व प्रकारचे उत्खनन आणि वाहतूक तात्काळ थांबवण्याचे कडक आदेश दिले असून, या धडक कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Follow Us:

