मतदान प्रक्रिया अधिक गतिमान करण्यावर भर; एस-३ ईव्हीएमचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण संपन्न!

(नंदुरबार) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात नवीन एस-३ मॉडेल ईव्हीएम आणि ईव्हीएम मॅनेजमेंट सिस्टीम (EMS) सॉफ्टवेअरबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
मतदान प्रक्रिया अधिक गतिमान करण्यावर भर; एस-३ ईव्हीएमचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण संपन्न!
s3-evm-demonstration-training-session-for-faster-voting
        यावेळी राज्य निवडणूक आयुक्त श्री. अतुल जाधव यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. नवीन ईव्हीएमची वैशिष्ट्ये, कार्यपद्धती आणि EMS सॉफ्टवेअरच्या वापराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. मतदान प्रक्रिया अधिक गतिमान, कार्यक्षम व सुरळीत करण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे संबंधित अधिकारी, उपजिल्हाधिकारी, सहाय्यक कक्षाधिकारी, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार तसेच निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रशिक्षणातून सक्षम यंत्रणा, कार्यक्षम निवडणूक व्यवस्थापन आणि सुरळीत मतदान प्रक्रियेला बळ!
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: