महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक विभागाच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख पदी तनवीर खान यांची नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्या विभागाच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख पदी नाशिक जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष तनवीर खान तांबोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक विभागाच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख पदी तनवीर खान यांची नियुक्ती
tanveer-khan-appointed-north-maharashtra-congress-minority-chief

        अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने संघटनात्मक फेरबदल करण्यात आले असून, नाशिक जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष तनवीर खान तांबोळी यांची उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

        अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगडी यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार साजिद पठाण यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली. महाराष्ट्राचे प्रभारी आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष अहमद खान यांनी काल राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र या विभागांच्या प्रमुखांची अधिकृत यादी जाहीर केली.
संघटन कौशल्याची पावती
         तनवीर खान तांबोळी गेल्या दोन वर्षांपासून नाशिक जिल्हा अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्यांचे काम आणि उत्कृष्ट संघटन कौशल्य विचारात घेऊन पक्षाने त्यांच्यावर उत्तर महाराष्ट्राची मोठी जबाबदारी सोपवली आहे.
राष्ट्रीय प्रभारी अहमद खान यांनी या नियुक्त्या जाहीर करताना सांगितले की, नवनियुक्त विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागातील जिल्ह्यांचा दौरा करावा. तसेच बूथ स्तरावर संघटना मजबूत करण्यासाठी नव्या कार्यकारिणीची स्थापना करावी.
सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
        तनवीर खान यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ गटनेते विजय पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार शोभाताई बच्छाव, खासदार गोवा पाडवी, आमदार हेमंत उगले, माजी आमदार शिरीष चौधरी, आमदार शिरीष नाईक, राष्ट्रीय समन्वयक आकाश छाजेड, राजाराम पानगव्हाणे, रमेश कांडोळे, भारत टाकेकर, बबलू खैरे, ज्ञानेश्वर गायकवाड, सुफी जीन, नगरसेविका सामिया खान, नगरसेविका नाझिया अत्तर, जावेद इब्राहिम, स्वप्नील पाटील, अल्तमस शेख, गौरव सोनार, मुन्ना ठाकूर, स्वाती जाधव, मुश्ताक शेख, उल्हास सातभाई, सुभाष देवरे, फारूक मन्सूरी, पारू कुरेशी, शहबाज मिर्झा, आदित्य बोरसे, राज छाजेड यांच्यासह सर्व ब्लॉक अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
        लवकरच उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा दौरा करून जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा योग्य समन्वय साधला जाईल. अल्पसंख्याक विभागाची मजबूत कार्यकारिणी स्थापन करून त्याचा अहवाल राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगडी आणि प्रदेशाध्यक्ष आमदार साजिद पठाण यांच्याकडे सादर केला जाईल.”
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: