
कोल्हापूर जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयातील सहायक संचालक वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.