Home महाराष्ट्र ‘मिशन सक्षम 3.0’ अंतर्गत युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी

‘मिशन सक्षम 3.0’ अंतर्गत युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी

Opportunity for skill development training for youth under 'Mission Saksham 3.0'

नंदुरबार जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगारक्षम कौशल्ये उपलब्ध करून त्यांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस विभाग आणि प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “मिशन सक्षम 3.0” या महत्त्वाकांक्षी कौशल्य विकास उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे मा.पालकमंत्री डॉ.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अहिल्यानगर येथे उच्च दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या युवक-युवतींच्या विशेष वाहनास हिरवी झेंडी दाखवून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत ग्रामीण व दुर्गम भागातील युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्ये, उद्योग क्षेत्रातील आवश्यक तांत्रिक ज्ञान आणि करिअर मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

“मिशन सक्षम 3.0” हा केवळ प्रशिक्षण कार्यक्रम नसून युवकांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारा आणि त्यांना आत्मनिर्भरतेकडे नेणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणांना नवे करिअर मार्ग उपलब्ध होणार असून त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे.

जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि विविध भागीदार संस्थांच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली.

.

.

.

#MissionSaksham30#SkillDevelopment#YouthEmpowerment#Nandurbar#EmploymentGeneration#CareerOpportunities#PrathamFoundation#DistrictAdministration#DrHasanMushrif#DrMittaliSethi#SkillIndia#NandurbarDistrict#युवकसक्षमीकरण#कौशल्यविकास#मिशनसक्षम#नंदुरबार#रोजगारनिर्मिती#जिल्हाप्रशासन

error: Content is protected !!
Exit mobile version