Home नंदुरबार शिष्यवृत्तीपरीक्षेत देवरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

शिष्यवृत्तीपरीक्षेत देवरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

2
Outstanding Success of Deore Vidyalaya Students in Scholarship Examination

नंदुरबार(प्रतिनिधी):-धंगाई विधायक कार्य मंडळाच्या विखरण (ता. नंदुरबार) येथील आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे, अंतर्गत उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकावत शिष्यवृत्ती पात्र ठरले. त्यात उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इ.5वी) तुषार गणेश पाटील (230 गुणांसह) तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इ.8 वी) सारिका मुकेश मराठे (200 गुण), वैष्णवी घनश्याम लोहार (198 गुण), मोहिनी जगदीश पाटील (192 गुण), दुर्गेश छगन मराठे (188) गुणांसह शिष्यवृत्ती पात्र ठरले. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देवरे, शालेय समिती अध्यक्षा शैलजा देवरे, सचिव नरेंद्र देवरे, कोषाध्यक्ष सतीश देवरे तसेच विखरण, नाशिंदा, बोराळा, खापरखेडा, गावातील ग्रामस्थांनी व पालकांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक डी. डी.साळुंके,एम.डी.नेरकर, एस.एच. गायकवाड, सी. व्ही. नांद्रे, डी.बी. भारती, वाय.डी. बागुल, डॉ.आर. आर.बागुल, एम. एस.मराठे, ए.एस. बेडसे, व्ही.बी. अहिरे आदींचे मार्गदर्शन लाभले.