Home नंदुरबार जिल्हा जैन समाजाच्या विकासासाठी योजनांना गती; नंदुरबारात आढावा बैठक संपन्न

जैन समाजाच्या विकासासाठी योजनांना गती; नंदुरबारात आढावा बैठक संपन्न

Plans for the development of Jain community accelerated; Review meeting concluded in Nandurbar

(नंदुरबार) जैन समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासासाठी शासनाकडून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिक गती देण्याचे निर्देश जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, नगरपालिका प्रशासन सह सह आयुक्त जमीर लेंगरेकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, अतिरिक्त जिल्हा नियोजन अधिकारी संतोष बोदडे तसेच विविध विभागांचे अधिकारी व जैन समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

समाजातील काही घटक अजूनही शिक्षण, रोजगार व व्यवसायाच्या संधींपासून वंचित असल्याचे नमूद करत योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्यावर भर देण्यात आला.

शासकीय योजनांबाबत जनजागृती, समुपदेशन व प्रशिक्षण वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सर्व योजना ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे काम अंतिम टप्प्यात असून यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक होणार आहे.

महिलांसाठी विना तारण कर्ज, युवकांसाठी स्वयंरोजगार योजना तसेच गृहनिर्माणासाठी बिनव्याजी कर्ज योजना राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. अर्ज नाकारण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी मार्गदर्शन वाढविण्यावर भर देण्यात आला.

धार्मिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी प्राचीन तीर्थक्षेत्रांचे संवर्धन, हस्तलिखित ग्रंथांचे डिजिटायझेशन तसेच साधू-संतांसाठी विहारधाम उभारण्याचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेऊन पायाभूत सुविधा, महिला बचत गट, तसेच मोठ्या प्रकल्पांसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

शासन, प्रशासन व समाजप्रतिनिधी यांच्या समन्वयातून जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नंदुरबार जिल्ह्यात योजनांना गती देण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

#Nandurbar#JainCommunity#MinorityDevelopment#GovernmentSchemes#InclusiveGrowth#WomenEmpowerment#SkillDevelopment#DigitalGovernance#Maharashtra

error: Content is protected !!
Exit mobile version