Home महाराष्ट्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, राज्यात पूर्वी नागरिकांना एप्रिल-मे महिन्यांत मोठ्या...

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, राज्यात पूर्वी नागरिकांना एप्रिल-मे महिन्यांत मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंगचा सामना करावा लागत होता.

Water Resources Minister Girish Mahajan said that earlier, citizens in the state had to face large-scale load shedding during the months of April-May.

मात्र गेल्या काही वर्षांत राज्यातील ऊर्जा क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात सुधारली आहे. उदंचन जलविद्युत (पंप्ड स्टोरेज पीएसपी) प्रकल्पांमुळे प्रदूषणमुक्त आणि शाश्वत वीज निर्मिती शक्य होत असून भविष्यात जवळपास १ लाख मेगावॅट क्षमतेचा टप्पा गाठण्याची क्षमता राज्यात निर्माण होत आहे. या प्रकल्पांमुळे २४ तास वीजपुरवठा सुनिश्चित करण्यास मदत होणार असून शासन यासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करत आहे.

तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्थेच्या वतीने कुंभी ऑफ स्ट्रीम क्लोज्ड लूप उदंचन प्रकल्प, जि. कोल्हापूर / सिंधुदुर्ग येथे दोन व शाहूवाडी येथे कडवी ऑफ स्ट्रीम क्लोज्ड लूप उदंचन प्रकल्प हा एक असे तीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून सुमारे ५ हजार १९९ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून ११०० मेगावॅट वीज निर्मिती क्षमता स्थापित होणार आहे. या तीनही प्रकल्पातून ११०० मनुष्यबळ रोजगार निर्मिती होणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version