Home शैक्षणिक राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा अधिक सक्षम करून बालकांना दर्जेदार सेवा उपलब्ध

राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा अधिक सक्षम करून बालकांना दर्जेदार सेवा उपलब्ध

0
Providing quality services to children by strengthening basic amenities in the state's Anganwadi centers.

मंत्रालय येथे नंदुरबार, अमरावती (मेळघाट), गडचिरोली, पालघर (वसई वगळून) आणि रायगड (कर्जत-१ व २) या पाच जिल्ह्यांमधील एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आयसीडीएस) अंतर्गत अंगणवाडी केंद्रांतील पायाभूत सुविधा, आवश्यक उपकरणांची उपलब्धता तसेच जून २०२६ अखेरच्या बालपोषण स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, आयुक्त वर्षा लढ्ढा, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख व संबंधित अधिकारी उपस्थित होते.