
या आढावा बैठकीत राज्यभरातील एचआयव्ही प्रतिबंध, उपचार आणि जनजागृतीसंबंधी उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीत एचआयव्ही उपचार पद्धती, जनजागृती मोहिमा आणि संवेदनशील समुदायांपर्यंत प्रभावी सेवा पोहोचविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ.सुनिल भोकरे, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड तसेच वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.