लोकसेवा हक्क आयोगाच्या आयुक्त श्रीमती चित्रा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीत नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा मिळाव्यात यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या:
• “आपले सरकार पोर्टल” वरील सेवांमध्ये पेंडिंग ऍक्ट युजर बाबत नियमित आढावा घेऊन तत्काळ पाठपुरावा करण्याचे निर्देश.
• कोणतीही सेवा मुदतीबाहेर दिली जाणार नाही, याची खात्री करण्याचे आदेश.
• जिल्ह्यातील प्रत्येक अधिकारी स्तरावर सेवा देताना अपेक्षित कागदपत्रांबाबत एकसारखेपणा राखण्याची आवश्यकता.
• प्रत्येक कार्यालयासमोर डिजिटल बोर्ड बसवून नागरिकांना आरटीएस कायद्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची व प्रशासनाच्या नाविन्यपूर्ण योजनांची माहिती देण्याचे निर्देश.
याशिवाय, उपस्थित सर्व विभागांना आरटीएस कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अपील प्रक्रिया चालवताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी योग्य पद्धतीचे पालन करण्याचे मार्गदर्शन देण्यात आले. तसेच, कायद्याचे महत्त्व व नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा याबाबतही अधिकाऱ्यांना जागरूक करण्यात आले.
तसेच नंदुरबार जिल्हा आरटीएस सेवा देण्याबाबत हा महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकावर असून नंदुरबार जिल्ह्यात सन 2025 2026 मध्ये 99% सेवा विविध कार्यालय मार्फत देण्यात आलेले आहे याबाबत माननीय लोकसेवा राज्य आयुक्त यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले व सांगितले की मार्च 2026 अखेर नंदुरबार जिल्ह्यात 100% सेवा देण्याबाबत प्रयत्न करावेत असे सांगितले
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#नंदुरबार#लोकसेवाहक्क#आपलेसरकारपोर्टल#CitizenServices#RTSAct#TransparentGovernance#DrMittaliSethi