सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” या महत्त्वाकांक्षी अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या उपस्थितीत जिल्हा महिला शासकीय रुग्णालय येथे करण्यात आला.
हे अभियान दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात राबवले जाणार असून, महिलांच्या आरोग्य तपासणी, उपचार सेवा आणि पोषण यावर विशेष भर दिला जाणार आहे.
अभियानाचे उद्दिष्ट:
• सर्व महिलांची नियमित आरोग्य तपासणी व सेवा उपलब्ध करणे
• निरोगी जीवनशैली व पोषणाबाबत जनजागृती करणे
• माता व बाल सुरक्षेसाठी ACP कार्ड मध्ये नोंदणी
• प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आणि आयुष्मान भारत कार्ड अंतर्गत नोंदणी
• सिकलसेल कार्ड व पोषण ट्रेकर मध्ये लाभार्थ्यांची नोंदणी
विशेष उपक्रम:
• रक्तदान शिबिरे
• निक्षय मित्र स्वयंसेवक नोंदणी (क्षयरोग निर्मूलनासाठी)
• अवयवदान नोंदणी
नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा यासाठी जवळच्या आयुष्मान आरोग्य मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्य सेवा केंद्र किंवा अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे यांच्यासह इतर वरिष्ठ डॉक्टर व अधिकारी उपस्थित होते.

#नंदुरबार#स्वस्थनारीसशक्तपरिवार#महिला_आरोग्य#Nutrition#HealthForAll#DrMittaliSethi