Home नंदुरबार आक्राणी तालुक्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी संयुक्त बैठक — तातडीच्या उपाययोजनांसाठी कडक सूचना

आक्राणी तालुक्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी संयुक्त बैठक — तातडीच्या उपाययोजनांसाठी कडक सूचना

Joint meeting for disaster management in Akrani taluka — strict instructions for urgent measures

(आक्राणी)

आज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व पोलीस अधीक्षक श्री. श्रवणकुमार दत्त यांच्या अध्यक्षतेखाली आक्राणी तालुक्यातील सर्व विभागप्रमुखांची आपत्ती व्यवस्थापन विषयक बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विभागांमार्फत पुरवठा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, सुरक्षा आणि आराखड्यांच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय व सूचना देण्यात आल्या.

प्रमुख मुद्दे व निर्देश:

आपदा मित्र ग्रुप तयार करण्याचा आदेश:

⦁ तालुका स्तरावर आपदा मित्र ग्रुप तयार करणे

⦁ या ग्रुपमध्ये प्रशासकीय अधिकारी, पोलिस, आरोग्य व ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी समाविष्ट करणे

⦁ ग्रामपंचायतनिहाय आपत्ती काळात उपयोगी साहित्याचे नियोजन करणे

आरोग्य विभागासाठी सूचना:

⦁ PHC स्तरावर औषध साठा व ASV उपलब्धता सुनिश्चित करणे

⦁ EDD मॅपिंग करून गर्भवती महिलांशी नियमित संपर्कात राहणे

⦁ अ‍ॅनिमिया मॅनेजमेंट, ब्लड स्टोरेज साठा ठेवणे व ब्लड बँक ऑपरेशनल ठेवणे

⦁ RH धडगाव येथे सोलर सिस्टम बसवण्याचे नियोजन

⦁ PHC मध्ये असलेल्या असुरक्षित निवास व्यवस्था दुरुस्तीसाठी अभियंत्यांकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

⦁ Assured Minimum Facility डिसेंबर 2025 पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश

शिक्षण विभागासाठी सूचना:

⦁ ड्रॉपआउट विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचे पुन्हा प्रवेश सुनिश्चित करणे

⦁ कार्यरत नसलेल्या शाळांची यादी मागवली

⦁ बालविवाह रोखण्यासाठी अधिक प्रभावी धोरणं तयार करणे

स्वच्छता व पाणी व्यवस्थापन:

⦁ सार्वजनिक ठिकाणांवर स्वच्छतेवर भर, विशेषतः लेटरिन, बाथरूम व पाणवठे

⦁ ग्रामपंचायती व सरपंचांचा सहभाग वाढवून स्वच्छता नियोजन

पोलीस विभागाच्या सूचना:

⦁ प्रत्येक ग्रामपंचायतीला सुरक्षा जॅकेट वितरित केल्याची माहिती

⦁ प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझमचा आढावा घेऊन सुधारणा सुचवणे

⦁ पुराच्या संभाव्य ठिकाणी अलर्टनेस राखणे व योग्य नियोजन करणे

प्रशासनिक तयारी:

⦁ आपत्ती व्यवस्थापन आराखडा अपडेट ठेवणे

⦁ ग्रामपंचायतनिहाय साहित्याचे त्वरित नियोजन व अहवाल सादर करणे

⦁ सरपंचांसाठी विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन

ही बैठक केवळ आपत्ती प्रतिसादाची तयारी नव्हे, तर प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाची बांधिलकी अधोरेखित करणारी होती. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी संपूर्ण यंत्रणेला सज्ज ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून, आगामी पावसाळ्यात कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी आक्राणी तालुका युद्धपातळीवर कार्यरत आहे.

#NandurbarPrepared#DisasterManagement#AkraniUpdates#CollectorOfficeNandurbar#MonsoonReadiness#EmergencyPreparedness#CommunitySafety

error: Content is protected !!
Exit mobile version