Home महाराष्ट्र राज्यातील डिजिटल जनजागृती, डिजिटल समावेशन आणि सुरक्षित मोबिलिटी परिसंस्था मजबूत करण्यासाठी रॅपिडो

राज्यातील डिजिटल जनजागृती, डिजिटल समावेशन आणि सुरक्षित मोबिलिटी परिसंस्था मजबूत करण्यासाठी रॅपिडो

Rapido to strengthen digital awareness, digital inclusion and safe mobility ecosystem in the state

या कराराद्वारे राज्यातील नागरिकांपर्यंत शासनाच्या डिजिटल सेवांची माहिती पोहोचविणे, कॅप्टन पडताळणी प्रक्रिया सक्षम करणे आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत जनजागृती वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

या सहकार्याअंतर्गत ‘आपले सरकार’, ‘महा आयडी’, ‘महासारथी’ यांसारख्या नागरिकाभिमुख डिजिटल सेवा आणि महाआयटीच्या विविध सार्वजनिक प्लॅटफॉर्मबाबत जनजागृती व वापर वाढविण्यासाठी रॅपिडोचे तंत्रज्ञान आणि कॅप्टन नेटवर्क उपयोगात आणले जाणार आहे.

या कराराच्या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव परिमल सिंह, महाआयटीच्या आयुक्त भुवनेश्वरी एस., महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर तसेच सीएसआर सहभागी उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version