
निधी आणि प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.क्षतिग्रस्त योजनांपैकी ४०३ योजनांमध्ये भराव काम झालेल्या ठिकाणी भराव टाकणे आणि नाल्यांचे खोलीकरण करण्याची कामे सुरू आहेत. यापैकी १९६ कामे पूर्ण झाली असून २०७ कामे प्रगतीपथावर आहेत. ४ मे २०२६ रोजीच्या निर्णयानुसार भराव टाकण्याचे काम अशासकीय संस्थांमार्फत करण्यासाठी प्रति घनमीटर २१ रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.