नंदुरबार, वृत्त — भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचे मा. अतिरिक्त सचिव श्री. पीयूष सिंह यांनी नंदुरबार जिल्ह्याचा दौरा करून आकांक्षित जिल्हा व आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विकास उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.
अक्कलकुवा तालुक्यातील डाब येथे त्यांनी स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. डाब परिसरातील
याच भेटीत स्थानिक नागरिकांनी डाब येथे प्रस्तावित 33/11 केव्ही विद्युत उपकेंद्रास मंजुरी देण्याची मागणी निवेदनाद्वारे मांडली. उपकेंद्र कार्यान्वित झाल्यास परिसरातील 190 पाडे व 13 गावांना लाभ होणार आहे.
दौऱ्याच्या पुढील टप्प्यात तळोदा तालुक्यातील सोमावल प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच Feeding India च्या सहकार्याने दुरुस्त व नव्याने विकसित अंगणवाडी केंद्राची पाहणी करण्यात आली. तसेच तळोदा शहरातील Feeding India Central Kitchen ला भेट देऊन अंगणवाड्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहार व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
या दौऱ्यादरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल उपस्थित होते. शेती, वीज, आरोग्य व पोषण या क्षेत्रांतील उपक्रमांना गती देणारा हा दौरा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरला.

#AspirationalDistrict#Nandurbar#PiyushSingh#DrMitaliSethi#StrawberryFarming#FarmerEmpowerment#PowerInfrastructure#HealthAndNutrition#FeedingIndia#TeamNandurbar