
नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.श्री. गोवाल पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित दोन दिवसीय दिशा समितीच्या बैठकीत केंद्र व राज्य शासनाच्या विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.
बैठकीत केंद्र शासनाच्या घरकुल योजनेसह विविध विकास योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा प्रगती आढावा घेण्यात आला.
यावेळी जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या काही पाणीपुरवठा योजनांमध्ये आढळून आलेल्या दिरंगाई व अनियमिततेची गंभीर दखल घेण्यात आली. कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर तातडीने कारवाई करून प्रलंबित कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. गुणवत्तापूर्ण व वेळेत कामे पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला.
बैठकीत राष्ट्रीय व राज्य महामार्ग, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच इतर विकासकामांचा सविस्तर आढावा घेऊन नागरिकांना अधिक परिणामकारक सेवा मिळाव्यात यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.
बैठकीत विविध विभागांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला. विकासकामांचा नियमित आढावा घेऊन त्यांची वेळेत व गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच सर्व विभागांनी अधिक समन्वयाने कार्य करून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.
#नंदुरबार#दिशासमिती#डॉ_मित्ताली_सेठी#सुशासन#विकासकामे#जलजीवनमिशन#घरकुलयोजना#लोकहित#नंदुरबारजिल्हा