(तळोदा) नागरिकांना अधिक दर्जेदार, स्वच्छ आणि सुसज्ज आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज उपजिल्हा रुग्णालय (SDH) तळोदा येथे भेट देऊन विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील सुविधा, स्वच्छता, वैद्यकीय सेवा आणि नवजात शिशु व मातांसाठी उपलब्ध यंत्रणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी प्रभावी समुपदेशन करण्याच्या सूचना देत प्रसूती पश्चात कक्ष (PNC Ward) अधिक सुसज्ज करण्यासाठी खिडक्या दुरुस्ती, पडदे, रंगकाम तसेच IEC चार्ट्स डिझाईन करण्याबाबत निर्देश देण्यात आले.
नवजात शिशु अतिदक्षता विभाग (SNCU) सुरू करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, उपकरणे आणि स्वतंत्र वीज बॅकअपची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती, परिचारिकांचे प्रशिक्षण तसेच आवश्यक साधनसामग्रीची पूर्तता करण्यावर भर देण्यात आला.
PNC Ward, NRC आणि इतर आवश्यक कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्यास सांगण्यात आले.
#नंदुरबार#तळोदा#डॉमित्तालीसेठी#आरोग्यसेवा#SDHTaloda#MaternalHealth#ChildHealth#SNCU#PublicHealth#Nandurbar#Taloda#Healthcare#Maharashtra
