
(नंदुरबार) जिल्हाधिकारी कार्यालयात आज नगरपरिषद विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीत नगरपरिषदांच्या दैनंदिन कामकाजावर, नागरिकांच्या सुविधा आणि शहर विकासासाठी आवश्यक असलेल्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
ठळक चर्चेचे मुद्दे पुढीलप्रमाणे होते:
या बैठकीस अपर जिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी नंदुरबार, सहाय्यक जिल्हाधिकारी तळोदा, सह आयुक्त नगरपरिषद, तसेच सर्व मुख्याधिकारी नगरपरिषद, तहसिलदार महसूल उपस्थित होते.
बैठकी दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सांगितले की,
“नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे आणि स्वच्छ, सुरक्षित शहर निर्माण करणे हे प्रत्येक नगरपरिषदेचे प्राधान्य असले पाहिजे. प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात.”
या बैठकीत सर्व नगरपरिषदांना ठोस कृती आराखडा तयार करून पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.
#Nandurbar#DistrictAdministration#DrMitaliSethi#SmartCity#UrbanDevelopment#MunicipalMeeting#CleanCityMission#WasteManagement#ParkingSystem#TaxCollection#CCTVInstallation#GoodGovernance#DigitalNandurbar#TeamNandurbar